Benefits from exercise in Marathi

व्यायाम
https://mr.wikipedia.org/s/64o
शारिरिक स्वास्थ्य वाढविणारी आणि आरोग्य टिकविणारी क्रिया म्हणजे व्यायाम.

नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर (उतारवयातही) निरोगी ठेवण्यास मदत होते. व्यायामाने मानसिक आरोग्यही छान राहते.
नियमित व्यायामामध्ये ताणण्याचे व्यायाम, एरोबिक्स व श्वासाचे व्यायाम यांचा समावेश असावा.व्यायाम केल्याने माणसाला नवीन उर्जा प्राप्त होते.
व्यायामाचे प्रकार[संपादन]
१. ताणण्याचे व्यायाम
उदा. योगासने, सूर्यनमस्कार
२. एरोबिक्स (रक्ताभिसरणाचे) व्यायाम
उदा. चालणे, धावणे, जॉगिंग, नृत्य, पोहोणे, सायकल चालविणे
३. श्वासाचे व्यायाम
उदा. प्राणायाम
४. शक्तिचे व्यायाम
उदा. वजन उचलणे व्यायामामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.यामुळे माणूस आनंदी राहायला मदत होते. व्यायाम आपली मानसिक शक्ती तसेच शारीरिक शक्ती वाढते. लहान मुलांमध्ये वाढणारा लठ्ठपणा हि सध्याची गंभीर जागतिक समस्या आहे आणि व्यायामामुळे हि कमी होण्यास मदत झाली आहे.
व्यायामाचे फायदे
वजन नियंत्रित राहण्यास मदत
फिटनेस मध्ये वाढ
नैराश्याचे प्रमाण कमी

No comments:

Post a Comment